Tuesday, September 11, 2012

एका नृत्याचा जन्म : नवीन आवृत्ती


श्री. दा. पानवलकरांच्या 'एका नृत्याचा जन्म' ह्या कथासंग्रहाची नवीन आवृत्ती जानेवारी २०१२मध्ये आलेय. मौज प्रकाशनच. पहिली आवृत्ती जून १९७५ मध्ये आलेली.
अपील -- सावली -- अजन्मा -- टक्कर -- गारठा -- बक अप रावण! -- ओलीस -- अनाहत -- भूमी -- फोमण्या येत आहे! -- चांदणं -- प्रवासी -- सहदेवा, अग्नी आण! -- एका नृत्याचा जन्म - या चौदा कथा आहेत ह्या संग्रहात.
मुखपृष्ठ आहे वसंत सरवट्यांचं आणि किंमत आहे एकशेपन्नास रुपये.

2 comments:

 1. @अवधूत : दोन तीन वर्षांपूर्वी नेटवर धुंडाळले होते तेव्हा पानवलकरांबद्दल काही सापडले नव्हते, तेव्हापासून आणखी काही सापडेल याची आशाच नव्हती आणि अचानक http://marathisahitya.blogspot.in/2007/10/blog-post_03.html या ब्लॉगवर केलेल्या देवघेवीच्या निमित्ताने आज हा ब्लॉग सापडला आणि खरोखर माझा आनंद आभाळात मावत नाहीये. सूर्य - जांभूळ - औदुंबर ही ३ पुस्तके आणि रत्नकीळ मधला अंतरकरांचा लेख या व्यतिरिक्त पानवलकरांबद्दल काहीच हाती लागले नव्हते आणि अशात हा ब्लॉग सापडावा याचा अत्यानंद झालाय ..

  'एका नृत्याचा जन्म मी गेली काही वर्ष शोधत होतो.. नव्या आवृत्तीची माहिती दिल्याबद्दल मी शतशः आभारी आहे ... एवढेच नाही तर त्यांच्या अन्य ग्रंथ संपदेची सूची मुखपृष्ठांसह दिल्याबद्दल तर आणखी शंभर वेळा धन्यवाद :)

  ReplyDelete
  Replies
  1. थँक्स. ह्या ब्लॉगचं श्रेय जया दडकर, म. द. हातकणंगलेकर आणि आनंद अंतरकर यांनाच देऊयात. कारण पहिल्या दोघांनी संपादित केलेलं नि तिसऱ्याने प्रकाशित केलेलं पानवलकरांचं पुस्तकच मुख्यत्त्वे उपयोगी पडलंय. आणि ब्लॉग करण्यापूर्वी अंतरकरांची फोनवरून परवानगी घेतली होती. खरं म्हणजे हे अधिक सुबकपणे व्हायला पाहिजे. दडकर, हातकणंगलेकर यांना हे सांगायला हवं, पण खूप प्रयत्न करूनही ते जमलं नाही. पण त्यातल्यात्यात अंतरकरांशीच संपर्क साधता आला. आणि पुस्तक जुनं आणि आता कुठेच सापडत नसल्यामुळे ब्लॉग केला. त्यामुळे ह्या लोकांचेच मुख्य आभार मानायला हवेत. काही भाग त्यांच्या पुस्तकाशिवायचा आहेच अर्थात, तेवढीच माझी अक्कल. बाकी यापलीकडे सगळ्याचं मूळ श्रेय पानवलकरांनाच देऊया :)

   Delete